उपवासाचे भगर पुन्हा नांदेडकरांच्या जिवावर बेतले

नांदेड(प्रतिनिधी)-उपवासासाठी भगर हा पदार्थ मोठ्याप्रमाणात वापरला जातो. पण हेच भगर आता नांदेडकरांच्या जिवावर उठल आहे काय? अशी प्रतिक्रिया उमटत आहे. हदगाव तालुक्यातील सहा गावातील 70 जणांना तर मुदखेड तालुक्यातील 2 जणांना भगर खाल्यामुळे विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
एकादशी उपवासानिमित्त लोहा तालुक्यात जवळपास 1500 ते 2000 भक्तांना विषबाधा झाल्याची घटना एक महिन्यापुर्वीच घडली होती. पुन्हा एक महिन्यानंतर हदगाव आणि मुदखेड तालुक्यातील काही गावात भगर खाऊन विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये मुदखेड तालुक्यातील एका गावात भगर खाल्यामुळे अचानक मळ-मळ आणि उलटया सुरू झाल्यामुळे उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. ही घटना ताजी असतांनाच 7 मार्च रोजी एकादशीनिमित्त हदगाव तालुक्यातील हडसणी, वाळकी, वाटेगाव, गुरफली यासह काही गावात भगर खाल्यानिमित्त जवळपास 60 ते 70 नागरीकांना अचानकपणे उलटया होणे, मळमळ करणे, चकरा येणे असा प्रकारच्या हालचाली शरिरात सुरू झाल्या. यासाठी काही नागरीकांनी जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतला असता. त्यांना हदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी त्या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विषबाधा झाला असल्याचे सांगितले. यांच्यावर उपचार करून यांना पुन्हा घरी पाठवून देण्यात आले आहे. सध्या या परिसरातील रुग्ण स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रदीप स्वामी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *