शासकीय तंत्र निकेतन येथे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबीलिटी गुजरात यांचा रोजगार मेळावा संपन्न

· रोजगार मेळाव्यात 117 विद्यार्थ्यांची निवड

नांदेड- शासकीय तंत्र निकेतन नांदेड येथे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबीलिटी गुजरात या कंपनीचा पूल कॅम्पस (रोजगार मेळावा) नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यासाठी विद्युत, यंत्र, उत्पादन व ऑटोमोबाईल पदविकाधारक पात्र होते. या मेळाव्यास धाराशिव, हिंगोली, परभणी, जिंतूर येथून व नांदेड जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन, ग्रामीण, सहयोग, मातोश्री तंत्रनिकेतन या संस्थेचे एकूण 170 विद्यार्थी हजर होते. या मेळाव्यात 117 विद्यार्थी मुलाखतीत कंपनीकडून निवडले गेले आहेत असे संस्थेचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी कळविले आहे.

या मुलाखती माहिती तंत्रज्ञान बिल्डिंगमध्ये स्थापत्य विभागात घेण्यात आल्या. सुकाणू समितीचे अध्यक्ष विभाग प्रमुख वि. वि. सर्वज्ञ, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा.संजय कंधारे, डॉ एस. एस. चौधरी, प्रा. ढोले, प्रा. अब्दुल हैदि, प्रा. मोहसीन, प्रा. मेश्राम, प्रा. कदम, प्रा. कटके, अफसर, पाटील यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी व्यवस्थापन केले . संस्थेचे प्रभारी प्राचार्य सकळकळे यांनी जनरल मॅनेजर जस्मिन पांचाळ, श्री. रेड्डी यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *