नांदेड -येथील वरिष्ठ पत्रकार तथा होमगार्डचे तालुका कमाडंन्ट प्रकाश कांबळे यांच्या आजी श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांचे आज दि.31 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 4 वाजता अकोला येथे दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 95 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. त्या गेल्या तीन वर्षांपासून आजारी होत्या. मुळच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथील येथील रहिवाशी असलेल्या श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांनी पतीच्या अकाली निधनानंतर दोन्ही मुलींना शिक्षणाची कास धरायला लावली. अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना मोल मजुरी करून त्यांनी मुलींचे संगोपन केले. श्रम करून स्वाभीमानाने जगण्याची शिकवण सर्व आप्तजणांना दिली. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या श्रीमती शाहूबाई क्षीरसागर यांनी सर्व नातवंडे आणि पणतू यांना उच्च शिक्षित होऊन आदर्श घडविण्याचे संस्कार केले. श्रीमती शाहूबाई क्षीरसागर या त्यांच्या कनिष्ठ कन्या माजी आदर्श शिक्षिका स. कमलताई मादुडे यांच्याकडे अकोला येथे वास्तव्यास होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या आजारी होत्या.आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी सहा वाजता अकोला शहरातील मोठी उमरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 985 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation टायनी एंजल्स प्री-प्रायमरी शाळेमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा विधानसभेसाठी जिल्हयात 27.51 लक्ष मतदार