नांदेड(प्रतिनिधी)-कर्जाच्या रक्कमेशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपये वसुल करून ते हिशोबात न दाखवणाऱ्या एका विरुध्द वजिराबाद पोलीसांनी सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. बालाजी भुजगंराव बोधगिरे या 48 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार राजेंद्रसिंघ बलविंदरसिंघ सिध्दु रा.तारासिंग मार्केट नांदेड या व्यक्तीने त्यांच्याकडून कोरे धनादेश घेवून महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलम 23 चे उल्लंघन केले आहे. राजेंद्रसिंघ सिध्दुने बालाजी बोधगिरेला 2 लाख 75 हजार रुपये कर्जा व्यतिरिक्त 50 हजार रुपये हे हिशोबात दाखवले नाहीत आणि 2500 रुपये दैनंदिन स्वरुपात वसुली केली आहे. कर्जदारास कर्जाऊ रक्कम 5 हजार रुपये देऊन कलम 25 चे उल्लंघन केले आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 42, 44 आणि 45 नुसार गुन्हा क्रमांक 406/2024 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 912 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोन युवकांना मारहाण करून सहा जणांनी लुटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन