नांदेड(प्रतिनिधी)-उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सर्वसाधारण बदल्या 2024 साठी पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी जिल्ह्यातील 315 पोलीस अंमलदारांना समुपदेशनासाठी बोलावले आहे. सन 2024 च्या सर्वसाधारण बदल्या कधी होतील या संदर्भाने राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सर्वच चिंतेत आहेत. पण नांदेडच्या पोलीस अधिक्षकांच्या मान्यतेनंतर गृह विभागाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ. अश्विनी जगताप यांनी दि.13 जून रोजी जारी केलेल्या बिनतारी संदेश क्रमांक 1194 नुसार जिल्ह्यातील 315 पोलीस अंमलदारांना उद्या दि.14 जून रोजी सकाळी 7 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात हजर राहण्यास सांगितले आहे. जे पोलीस अंमलदार समुपदेशनासाठी हजर राहणार नाहीत त्यांची प्रशासकीय सोयीनुसार बदली करण्यात येईल.नांदेड जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयातून समुपदेशनासाठी जाहीर करण्यात आलेल्या 315 पोलीस अंमलदारांची पीडीएफ संचिका बातमी सोबत जोडली आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा सर्व पोलीस अंमलदारांना सांगू इच्छीते की, दिलेल्या वेळेत हजर राहा नसता तुमची बदली होणार नाही. Kanthak Suryatal Post Views: 1,160 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शहरात ड्रेनेज, नालेसफाई मोहिम राबवा, अन्यथा आंदोलन -बंटी लांडगे नांदेड जिल्ह्यातील 9 पोलीस अंमलदार आता झाले श्रेणी पोलीस उपनिरिक्षक