अर्धापूर तालुक्यातील देगाव बुद्रुक येथील घटना; मृताची ओळख पटविण्याचे आव्हान अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर तालुक्यातील देगाव बुद्रुक परिसरात आसना नदीपात्रात अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून हत्याराने मारहाण करून गंभीर दुखापत करत त्याचा खून केल्याचे प्राथमिक तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी गाडेगाव ते त्रिकूट जाणाऱ्या रस्त्यावरील देगाव बुद्रुक येथील आसना नदीपात्रात हा प्रकार घडल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे. मृत व्यक्तीची अंदाजे ३५ वर्षे वय असल्याची माहिती असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी देगाव बुद्रुक येथील पोलीस पाटील रेखा शहाजी जाधव (वय ३८) यांनी बारड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे करीत आहेत. नदीपात्रात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून, मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि खुनामागील कारणाचा शोध घेणे हे पोलिसांसमोर महत्त्वाचे आव्हान आहे. Kanthak Suryatal Post Views: 13 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अमेरिका-इराण युद्ध पेटणार? ट्रम्प यांचा ८१ हजार आंदोलकांच्या मृत्यूचा खळबळजनक दावा!