लातूर सायबर पोलीस ठाण्यात प्रशांत सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद लातूर (विशेष बातमीदार) – वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी देणगी गोळा करण्याच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी समता फाउंडेशन या अशासकीय संस्थेचा अध्यक्ष प्रशांत प्रभाकर सुरवसे, वय २० वर्ष, राहणार भिमनगर, तावरजाखेडा, जिल्हा धाराशिव याच्याविरुद्ध लातूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की प्रकरण काय आहे? नांदेड एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथक कॅम्प लातूर येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वसंतराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लातूर येथील समता फाउंडेशन, सार्वजनिक न्यास नोंदणी क्रमांक एफ-००२७३१५ एलटीआर, या संस्थेच्या इन्स्टाग्राम पेजवरून वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. देणगी स्वीकारण्यासाठी एक डिजिटल QR कोड इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यात आला होता. गोपनीय तपासात असे उघडकीस आले की, प्रसारित करण्यात आलेला QR कोड संस्थेच्या अधिकृत बँक खात्याचा नसून, अध्यक्ष प्रशांत सुरवसे याच्या बँक ऑफ बडोदा, शाखा लातूर येथील वैयक्तिक बचत खात्याशी, खाते क्रमांक ०९९००१०००५०७६९, युपीआय आयडी ८२६१०३३२९८@ptsbi, जोडलेला होता. फसवणूक आणि गैरव्यवहार संस्थेच्या नियमावलीनुसार अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांच्या संयुक्त स्वाक्षरीने बँक खाते उघडून व्यवहार करणे बंधनकारक असताना, आरोपीने संस्थेचे बँक खाते न उघडता स्वतःचे वैयक्तिक खाते वापरले. नागरिकांकडून संस्थेच्या नावाने देणगी स्वीकारून ती रक्कम वैयक्तिक खर्चासाठी वापरली आणि शासनापासून आर्थिक व्यवहार लपवून ठेवून देणगीदारांची विश्वासघात व तोतयागिरीद्वारे फसवणूक केली. दाखल गुन्ह्याचा तपशील: घटना कालावधी: ०५ जुलै २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ गुन्हा नोंद दिनांक: २५ नोव्हेंबर २०२६, प्रथम खबर क्रमांक ०००८/२०२६ पोलीस ठाणे: सायबर पोलीस ठाणे, लातूर लागू कलमे: भारतीय न्याय संहिता बीएनएस, २०२३: कलम ३१६(२), ३१८(४), ३१९(२) माहिती तंत्रज्ञान अधिनियम आयटी ॲक्ट, २०००: कलम ६६(डी) या प्रकरणाचा पुढील तपास लातूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 27 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तमिळनाडूत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान; दीपथून वादामागे १०८ विरुद्ध १२१ चे सत्ताकारण! हे लोकशाहीतील बंड नसून पक्षविरोधी डाका! सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल