नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक या पदावर आज आपल्या कामकाजाचा पहिला दिवस पाहणारे संदीप जाधव यांनी सांगितले की, जिल्हयात कायद्याला अभिप्रेत काम करेल. आई रेणुकेचे स्थान असलेल्या चिखली जि.बुलढाणा येथील संदीप जाधव यांनी आपले शिक्षण पुर्ण केल्यानंतर सन 2005 मध्ये पोलीस दलात प्रवेश केला. पोलीस उपअधिक्षक प्रशिक्षणार्थी हा कार्यकाळ त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात पुर्ण केला. त्यानंतर प्रथम पोलीस उपअधिक्षक पद कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे सांभाळले. त्यानंतर पुन्हा अहिल्यानगर जिल्ह्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यांनी आपले कामकाज पाहिले आणि सन 2014 मध्ये अपर पोलीस अधिक्षक ही पदोन्नती मिळवून जळगाव त्यानंतर चाळीसगाव येथे अपर पोलीस अधिक्षक म्हणून काम केले. पुढे त्यांनी राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई त्यानंतर पुणे ग्रामीण जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक त्यानंतर गुन्हे अन्वेशन विभाग पुणे येथे काम केले. त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्ह्यात पीसीआर या विभागात पोलीस अधिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर मुंबई शहरात कार्यरत झाले आणि त्यांनी आज नांदेड जिल्ह्याच्या अपर पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळला आहे. वास्तव न्युज लाईव्हशी बोलतांना संदीप जाधव म्हणाले की, कायद्याला अभिप्रेत असलेलीच कामे माझ्यावतीने केली जातील. सर्वसामान्य नागरीकाला कसा न्याय देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 281 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation चाकूरमध्ये ११.७० लाखांचे ५४० किलो चंदन जप्त; डीआयजी पथकाची धडक कारवाई न्यायालयात बॉम्बचा ईमेल पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल