कंधार (प्रतिनिधी) – कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे आयोजित ग्रामसभेदरम्यान गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, या प्रकरणी तीन ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी घडली. अंबुलगा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील माणिक प्रभू महाराज मंदिराच्या प्रांगणात सोमवारी सकाळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेदरम्यान विविध विषयांवर चर्चा करून कामकाज पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात येत असताना काही ग्रामस्थांनी आक्षेप घेत गोंधळ घातल्याचा आरोप आहे. ग्रामस्थ गजानन गोविंद भोसले, विजय शिरसे आणि चंद्राजी सोनकांबळे यांनी आरडाओरड करून ग्रामसभेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे वृत्त आहे. यावेळी त्यांनी विस्तार अधिकारी कैलास रेनवार यांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामसभेच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शासकीय कामकाज सुरू असताना अशा प्रकारे अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसभेसारख्या लोकशाही प्रक्रियेत शांतता राखणे आणि शासकीय कामकाज सुरळीत पार पडू देणे आवश्यक असताना घडलेल्या या प्रकाराची दखल घेण्यात आली आहे. संबंधित व्हिडीओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-26-at-20.04.26-2.mp4 Kanthak Suryatal Post Views: 40 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सक्तीच्या वसुलीविरोधात आष्टीतील महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव