नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ठाकरे सेनेच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल असे आश्वासन नूतन लोकसभा संपर्कप्रमुख किशोर पोद्दार यांनी केले. नांदेड शहरातील हॉटेल विसावा येथे शहरात पदाधिकाऱ्यांच्या कार्य अहवाल बैठकीत निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी सध्याची पक्षाची परिस्थिती संपर्कप्रमुखांना अवगत करून दिली. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रभागात शाखाप्रमुख ते गटप्रमुख व नागरिकांच्या समस्या याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सदैव तत्पर असल्याचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी सांगितले. या बैठकीस सह संपर्क प्रमुख दयालगिरी. उपजिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे. युवा सेनेचे महेश खेडकर यांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर नूतन लोकसभा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार. मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार. मनोज यादव सहसंपर्कप्रमुख दयालगिरी. उपजिल्हाप्रमुख वेंकोबा येडे. शहर प्रमुख जितूसिंग टाक. अर्जुन ठाकूर. बालाजी कल्याणकर. ब्रिजला उगवे बाया शर्मा शहर प्रवक्ता नागनाथ माधापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस नांदेड शहरातील निष्ठावंत शिवसैनिक माधवराव कल्याणकर. बंडू देशमुख. निवृत्ती जिंकलवाड. गजानन हरकरे. भाया शर्मा. विजय कल्याणकर. नवज्योत सिंग गाडीवाले. खाजाभाई. मोहम्मद गौस. कामगार सेना शहर प्रमुख नितीन सरोदे. श्रीपाद रायवार. कारण इतकाळ. सुरज फटाले. सचिन पाटील. युवा सेनेचे डॉक्टर सौरभ देवकते. रवी नागरगोजे. प्रमोद मैंद. नितीन वाघमारे. गणेश पेन्सिलवार. अशोक पावडे. अक्षय आव्हाड. देवीलाल यादव संजय काळे. आनंद वाघमारे. शिवा सूर्यवंशी संजय साबणे . बाबासाहेब निळेकर. लालचंद यादव. गजानन कोरडे. राजू यादव. मनीष झगडे. यांच्यासह शहरातील निष्ठावंत पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते शेवटी मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी शहरात प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे वार्ड निहाय शाखा स्थापन करून पक्ष मजबूत करण्याचे आश्वासन संपर्कप्रमुख किशोर पोद्दार यांना दिले. Kanthak Suryatal Post Views: 238 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नांदेड सहित राज्यातील ऑटो चालकांचे इ चलन माफी देण्यात यावी. जयहिंद ऑटो सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !