नांदेड (विशेष प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग तसेच नांदेड भारत स्काऊट आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण सातदिवसीय (२८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विजयनगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या शिबिरात सहभागी शिक्षक वृंदासाठी ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत विशेष प्रबोधन व्याख्यान पार पडले. नांदेड जिल्हा स्काऊट गाईडच्या आयुक्त श्रीमती भागीरथी बच्चेवार यांच्या निमंत्रणावरून ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे मराठवाडा विभाग संघटक इंजिनिअर बालाजी लांडगे आणि नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. सायन्ना मठमवार यांनी उपस्थित राहून शिबिरातील सहभागी शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमप्रसंगोपात्त्य दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून देण्यात आला. आपल्या प्रबोधनपर भाषणात डॉ. सायन्ना मठमवार यांनी ग्राहकांचे मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि दैनंदिन जीवनातील जागरूकतेचे महत्त्व यावर सविस्तर माहिती दिली. यानंतर इंजिनिअर बालाजी लांडगे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. ग्राहक आणि विद्यार्थी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगून ते म्हणाले, “शाळा व महाविद्यालयांमधून विद्यार्थी ग्राहक जागरण व्याख्यानांच्या माध्यमातून सातत्याने प्रबोधन केले जाते. फसवणूक झाल्यास संघटनेच्या ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्रा’च्या माध्यमातून ग्राहकांना दिलासा व योग्य कायदेशीर मार्गदर्शन दिले जाते. यासोबतच त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, ग्राहक आयोग आणि आधुनिक युगात होणारी ऑनलाईन फसवणूक व त्यापासून घ्यावयाची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. शिबिरात उपस्थित सर्व शिक्षक वृंदाने या प्रबोधनाचा लाभ घेतला. स्काऊट प्रशिक्षण आयुक्त रमेश फुलारी सर यांच्या आभार प्रदर्शन केले. जलपानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदरील कार्यक्रमास जिल्हा स्काऊट गाईड चे सर्व पदाधिकारी, सदस्य यांची आवर्जून उपस्थिती लाभली. Kanthak Suryatal Post Views: 136 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्वच्छता ही सेवा – सफाई मित्र सुरक्षा सेवा तथा सन्मान शिबिर हातात झाडू घेऊन दिव्यांगांची गांधीगिरी; शेकडो दिव्यांगांचा सहभाग, विशेष शाळांच्या चौकशीची सुद्धा केली मागणी