नांदेड विभागातील 119 सफाई मित्रांची आरोग्य तपासणी नांदेड (प्रतिनिधी) – स्वच्छता ही सेवा – सफाई मित्र सुरक्षा सेवा तथा सन्मान शिबिराच्या अंतर्गत, 30 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड विभागातील सात ठिकाणी सफाई मित्रांसाठी व्यापक आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ही शिबिरे मुख्य वैद्यकीय अधीक्षक, नांदेड, डॉ. एम. के. श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. ही आरोग्य तपासणी शिबिरे हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानक, विभागीय रेल्वे रुग्णालय नांदेड, उपविभागीय रुग्णालय पूर्णा, आरोग्य केंद्र अकोला, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक, नगरसूल रेल्वे स्थानक आणि आरोग्य केंद्र आदिलाबाद येथे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये एकूण 119 सफाई मित्रांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर विभागीय वैद्यकीय अधिकारी, नांदेड डॉ. दुर्गा प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात 29 सफाई मित्रांनी सहभाग घेतला. यामध्ये रक्तदाब (BP), सामान्य रँडम रक्तातील साखर (GRBS), उंची, वजन तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान 2 सफाई मित्रांना मधुमेह (Diabetes Mellitus) आणि 2 सफाई मित्रांना उच्च रक्तदाब (Hypertension) असल्याचे निदान झाले. विभागीय रेल्वे रुग्णालय, नांदेड येथे वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी, नांदेड डॉ. मनीषा यांनी 7 सफाई मित्रांची आरोग्य तपासणी केली. उपविभागीय रुग्णालय, पूर्णा येथे CMP/पूर्णा यांनी 23 सफाई मित्रांची, तर आरोग्य केंद्र, अकोला येथे CMP/अकोला यांनी 15 सफाई मित्रांची आरोग्य तपासणी केली. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर 22 सफाई मित्रांची, तर नगरसूल येथे 11 सफाई मित्रांची आरोग्य तपासणी CMP/जालना यांच्या मार्फत करण्यात आली. आरोग्य केंद्र, आदिलाबाद येथे DMO/आदिलाबाद यांनी 12 सफाई मित्रांची आरोग्य तपासणी केली. यापैकी 2 सफाई मित्रांना उच्च रक्तदाब (Hypertension) असल्याचे निदान झाले. सर्व सात ठिकाणी रक्तदाब (BP), सामान्य रँडम रक्तातील साखर (GRBS), उंची, वजन तसेच वैद्यकीय तपासणीसह सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरांदरम्यान सफाई मित्रांना विविध शासकीय सामाजिक कल्याण व सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY), आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) यांचा समावेश होता. तसेच उत्तम आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षा लाभ मिळण्यासाठी ABHA आणि ESI अंतर्गत नोंदणी करण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. मुख्य वैद्यकीय अधीक्षक, नांदेड, डॉ. एम. के. श्रीनिवास यांनी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरील आरोग्य तपासणी शिबिरास भेट देऊन सफाई मित्रांशी संवाद साधला. त्यांनी विविध सामाजिक कल्याण योजनांच्या लाभांची माहिती दिली तसेच ABHA आणि ESI नोंदणीचे महत्त्व अधोरेखित केले. पात्र सफाई मित्रांची नोंदणी सुलभ करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य निरीक्षकांना दिल्या. सफाई मित्र सुरक्षा सेवा एवं सन्मान उपक्रमाचा एक भाग म्हणून तसेच सफाई मित्रांच्या व्यावसायिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, नांदेड यांनी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर सफाई मित्रांना संरक्षक हातमोजे आणि मास्कचे वितरण केले.रेल्वे परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सफाई मित्रांच्या आरोग्य, सुरक्षितता, कल्याण आणि सन्मानाप्रती नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेची बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित होते. Kanthak Suryatal Post Views: 139 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन रामधन राठोड यांचे निधन स्काऊट-गाईड प्रशिक्षण शिबिरात ग्राहक प्रबोधन व्याख्यान संपन्न