अर्धापूर (प्रतिनिधी) – २०११ साली अर्धापूर येथे झालेल्या जाहीर सभेत धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी एमआयएमचे नेते तथा आमदार अकबर ओवेसी बुधवारी अर्धापूर न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर केला. २०११ मध्ये अर्धापूर येथे झालेल्या जाहीर सभेत अकबर ओवेसी यांनी धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी हैदराबाद येथील भाजपचे आमदार टी. राजा यांनी न्यायालयामार्फत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा अर्धापूर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत अकबर ओवेसी आज अर्धापूर न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे तब्बल २०११ पासून सुरू असलेल्या या प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत असून, त्याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. ऍड. तहुर खान पठाण,ऍड. अब्दुल खाजा,ऍड. अझहर,ऍड.मुझमिल यांनी अकबरोद्दीन ओवेसी यांची बाजू मांडली.एमआयएमचे नेते सय्यद मोईन आणि त्यांचे सर्व सहकारी अर्धापूर येथे उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 130 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भारत फायनान्शियल कंपनीची ६ लाखांची फसवणूक; तामसा पोलिसांत गुन्हा दाखल