RTI अर्जापासून द्वितीय अपीलापर्यंत नागरिकांची फरफट; माहितीच्या सार्वत्रिक प्रवेश दिनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन नांदेड (प्रतिनिधी) – माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत नागरिकांना वेळेत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात माहिती मिळविण्यासाठी RTI अर्ज → प्रथम अपील → द्वितीय अपील → सुनावणी अशा प्रदीर्घ प्रक्रियेत जावे लागत असल्याची बाब विविध प्रकरणांतून समोर आली आहे. माहितीच्या सार्वत्रिक प्रवेश दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते व दिव्यांग हक्क कार्यकर्ते राहुल सिताराम साळवे यांनी आज जिल्हाधिकारी, नांदेड यांना निवेदन देऊन प्रलंबित माहिती अधिकार प्रकरणांमध्ये आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली. साळवे यांनी निवेदनात जिल्हा परिषद नांदेडच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातील दोन दिव्यांग शाळांशी संबंधित माहिती, समाजकल्याण विभाग लातूर, जिल्हा परिषद यवतमाळमधील शिक्षण विभाग, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचा आस्थापना विभाग तसेच केंद्र शासनाच्या DoPT कडे PwBD प्रवर्गातून IAS सेवेत नियुक्तीशी संबंधित माहिती अशा विविध प्रकरणांचा उल्लेख केला आहे. या प्रकरणांपैकी काही प्रकरणे राज्य माहिती आयोगापर्यंत पोहोचली आहेत, तर लातूर येथील प्रकरणात सप्टेंबर 2026 मध्ये सुनावणी होऊनही आदेशाची प्रत अद्याप प्राप्त झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेशी संबंधित प्रकरणात राज्य माहिती आयोगाने आदेश पारित केला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिव्यांगांशी संबंधित माहितीमध्ये पारदर्शकतेची मागणी दिव्यांग शाळांमधील नियुक्त्या, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, प्रशासकीय मान्यता, अनुदान, तक्रारी तसेच सार्वजनिक निधीशी संबंधित माहिती नागरिकांना उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे साळवे यांनी निवेदनात नमूद केले आहे. माहितीचा अधिकार हा केवळ अर्ज करून पुढे अपील करत राहण्याचा विषय न राहता नागरिकांना वेळेत माहिती मिळवून देणारी प्रभावी व्यवस्था झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रलंबित RTI व प्रथम अपीलांचा नियमानुसार निपटारा करावा, माहिती आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी करावी आणि दिव्यांग व्यक्ती, दिव्यांग संस्था, नियुक्त्या, अनुदान व सार्वजनिक निधीशी संबंधित माहितीमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 53 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इंडियन एक्सप्रेसच्या स्फोटक वृत्तांताने उघड केला मत चोरीचा महाघोटाळा! नांदेड काँग्रेसची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक: ज्ञानेश कुमारांची हकालपट्टी करा! ज्ञानेश कुमार गद्दार आहे! – थेट घराच्या भिंतींवर कालिख फासून तीव्र जनक्षोभ; लोकशाहीच्या मारेकऱ्यांचा बुरखा फाटला!