धर्माबादमध्ये बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन वृद्धाची सोन्याची चैन लंपास

धर्माबाद (प्रतिनिधी):- सार्वजनिक रोडवर एका 70 वर्षीय वृद्धाला बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन त्यांच्याकडील 61 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना धर्माबाद येथे घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.40 वाजण्याच्या सुमारास सुमारास, सार्वजनिक रोडवर धर्माबाद येथे दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून फिर्यादी मंगलाबाई मोहनराव कोंडावार (वय 70, रा. पटेल नगर, धर्माबाद) यांच्याशी संपर्क साधला. आरोपींनी फिर्यादीला बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन दिशाभूल केली आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली.

या प्रकरणी धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 209/2026 नुसार BNS कलम 318(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोउपनिरीक्षक पठाण तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!