नांदेड (प्रतिनिधी)- हंगरगा (ता. मुखेड) येथील सुपुत्र श्रीकांत मलिकार्जुन वारे यांना द टाइम्स ऑफ इंडिया आयोजित ET Enterprise Security Awards 2026 मध्ये Rising Star of the Year या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.श्रीकांत वारे यांना सायबर सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट नेतृत्व आणि नाविन्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन हा राष्ट्रीय सन्मान देण्यात आला आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे हंगरगा गावासह संपूर्ण मुखेड तालुक्याचा आणि नांदेड जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. या अद्वितीय यशाबद्दल श्रीकांत वारे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
More Related Articles
स्थानिक गुन्हा शाखेने 6 लाख 10 हजारांचे पशुधन पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने मुदखेड येथे टेकडीगल्लीमध्ये एका टिनपत्राच्या शेडमधून कत्तलीसाठी आणलेले वासरांसह 59 गायी…
शालेय मुलामुलींचा बालविवाहास विरोध करण्याचा संकल्प
नांदेड – जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बालविवाह मुक्त भारत अभियान’…
कृषी पर्यवेक्षक, वितरक अशा 14 जणांनी शासनाची 6 कोटींची फसवणूक केली
नांदेड(प्रतिनिधी)-कृषी अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांना दिलेल्या जाणाऱ्या सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचांची सतत…
