नांदेड (प्रतिनिधी)- स्वर्गीय दिगंबरराव गणपती आंबटवार आलेगांवकर (माळकरी) यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त बळीरामपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नागोराव आंबटवार यांच्या वतीने ‘भाऊचा डब्बा’ या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना भोजनाचे डबे वाटप करण्यात आले. महावीर चौक येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित या उपक्रमातून गरजू नागरिकांना भोजनाचे डबे देण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे निवृत्त ग्रंथपाल विठ्ठल आंबटवार, लहुजी शक्ती सेनेचे कोअर कमिटी जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, दैनिक लोकपत्रचे उपसंपादक सुरेश आंबटवार, सुदर्शन कलवले, ‘भाऊचा डब्बा’चे समन्वयक प्रभुदास वाडेकर यांच्यासह परिवारातील सदस्य दिलीप आंबटवार, उत्तम आंबटवार, गणराज आंबटवार, स्वराज आंबटवार, अजिंक्य आंबटवार, आनंदराज आंबटवार, स्वराली आंबटवार, अदिती आंबटवार आदी उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 407 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बौद्धिक दिव्यांग तरुणीवरील बलात्कार प्रकरणात आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी; नांदेड सत्र न्यायालयाचा निकाल झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट अंतर्गत नांदेड येथे एकदिवसीय प्रशिक्षण