अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर तालुक्यातील मौजे पारडी (म) येथे सोलार प्लांटच्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्यांनी साहित्य चोरी करत मोठी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेले, तर तोडफोडीमुळे सुमारे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी सोलार प्लांटच्या ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरून नेले. तसेच ट्रान्सफॉर्मर व इतर साहित्याची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले.
याप्रकरणी अफगान खाज्या फैजुला खाज्या (वय ३८, रा. लातूर फाटा, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०३(२) व ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि कांबळे करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरातील सोलार प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.