उमरी (प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील बेलदरा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी पहाटे १२.१५ ते सकाळी ५ वाजेदरम्यान ही घटना घडली. फिर्यादी संतोष संभाजी पटणे (वय ४०, रा. बेलदरा, ता. उमरी) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ कानगुलवार करीत आहेत. या घरफोडीमुळे नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक सतर्कता बाळगावी, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 490 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला; एक आरोपी अटकेत शेतातून सौर पॅनेल व हळद चोरी; दोन ठिकाणी सव्वा लाखांचा ऐवज लंपास