नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लोहा व अर्धापूर तालुक्यात शेतातील साहित्य चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. लोहा तालुक्यातील मौजे आडगाव शेतशिवारात 20 जुलै रात्री ते 21 जुलै सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतातील सौरऊर्जेचे सोलार पॅनेल प्लेट चोरून नेले. या पॅनेलची किंमत 50 हजार रुपये असल्याची तक्रार दिनकर त्र्यंबक कदम (वय 50, रा. सावरगाव नसरत, ता. लोहा) यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. साखरे करीत आहेत. दरम्यान, अर्धापूर तालुक्यातील मौजे पाईडी शेतशिवारात 19 जुलै रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेली 80 हजार रुपये किमतीची हळद अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी सचिन राजेश्वर देशमुख (वय 39, रा. पाईडी, ता. अर्धापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ. गोरकर करीत आहेत. शेतातील महागडे साहित्य व कृषीमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी शेत परिसरात सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. Kanthak Suryatal Post Views: 496 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये भारत बंदला मोठा प्रतिसाद; बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेनंतर शहरात भव्य मोर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाने थकवले १३.३२ लाख पण आता द्यावे लागणार ५० लाख रुपये