नांदेड (प्रतिनिधी) – यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातून एका अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी या मुलाला धमकावून त्याच्याकडून रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने एकूण ६,६३३ रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:३० ते २:३० च्या सुमारास घडली. फिर्यादी अल्पवयीन बालक हा यशवंत महाविद्यालयात इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत आहे. शनिवारी दुपारी तो महाविद्यालयाच्या लायब्ररीतून बाहेर पडत असताना, काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडवले. आम्हाला टी.सी. काढायची आहे, आमच्यासोबत चल असे सांगून त्यांनी या बालकाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून एका निर्जन ठिकाणी नेले. त्या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या इतर दोन साथीदारांसह मिळून या चौघांनी अल्पवयीन बालकाला बेदम मारहाण केली. आरोपींनी त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतला आणि फोन पे द्वारे ६,१३३ रुपये एका अज्ञात व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. इतकेच नव्हे तर, त्या बालकाच्या खिशातील ५०० रुपये रोख देखील काढून घेण्यात आले. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ च्या कलम ३०९(६), १३७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनोद देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 886 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध वाळू वाहतुकीवर वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई; दोन टेम्पो जप्त, ₹7.07 लाखांचा मुद्देमाल हस्तगत मोदीजी, आता तरी बाळगा .. ! ६ वर्षांच्या देवराजचा जंतरमंतरवरील व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल