नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा प्रशासनच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती नोडल अधिकारी मिनल करनवाल यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत आज गुरुवार दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्त्व, जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणारी तयारी, जनजागृती उपक्रम आदी विषयी त्यांनी या मुलाखतीतून माहिती दिली आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,264 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राजकीय पक्ष निवडणुकीत जातीचे समीकरण वापरतात तर नांदेड जिल्हा पत्रकारांमध्ये सुध्दा “एम’ फॅक्टरवर काम करण्याची चिंदीगिरी नांदेडमध्ये 5 एप्रिलपासून प.पू. स्वामी श्री प्रिया शरणजी महाराज यांची श्रीराम कथा