नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस दलातील 14 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे उत्साहात पार पडला. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्तांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, आनंदी व समाधानकारक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. पोलीस कल्याण विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे :
- साहेबराव लक्ष्मण गुट्टे – पोलीस उपअधीक्षक
- बाबा नागोराव जगभारे – पोलीस उप निरीक्षक नि. क. नांदेड
- प्रल्हाद संभाजी हैबतकर – पोलीस उप निरीक्षक जिल्हा विशेष शाखा,
- बाबू मसाजी शिंदे – पोलीस उप निरीक्षक विमानतळ सुरक्षा पथक
- सुदाम आमरू आडे – पोलीस उप निरीक्षक पोलीस ठाणे बारड
- हनुमान कानोजी मेश्राम – श्रेणी उप. नि. पोलीस ठाणे मांडवी
- परमेश्वर जळबा कदम – श्रेणी उप. नि. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण
- जगदीश मल्हारराव कुलकर्णी – श्रेणी चा.उप. नि. जिल्हा विशेष शाखा,
- देविदास सोनबाजी बसवंते – पो.अ.पोलीस मुख्यालय, नांदेड
- रानबा मारोतराव फड – पो.अ. पोलीस ठाणे सोनखेड
- कैलास किशनराव झडते – पो.अ.पोलीस ठाणे भोकर
- दर्शन शिशुपाल यादव – पो.अ. पोलीस मुख्यालय, नांदेड
- तानाजी माधवराव बिराजदार – पो.अ. पोलीस ठाणे देगलूर
- आनंदा देवराव बैनवाड – पो.अ. पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड
समारंभास पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार,अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,सूरज गुरव,पोलीस उप अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप,प्रशांत शिंदे अनेक कर्मचारी तसेच पोलीस कल्याण विभागाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अच्युत मोरे यांनी केले. पोलीस अंमलदार हणमंत पोतदार,मारोती कांबळे,नरेंद्र राठोड,सविता भीमलवाड यांनी उत्कृष्ट नियोजन केले. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव व्यक्त करत सहकाऱ्यांचे आभार मानले.
