नांदेड (प्रतिनिधी)-जिल्हा पोलीस दलातील चालक पोलिस हवालदार मनोज जोंधळे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची अंतिम यात्रा आज सायंकाळी ४ वाजता भीमवाडी येथील राहत्या घरातून निघणार असून पुढे मरघाट स्मशानभूमीकडे जाईल. मनोज जोंधळे हे दुसऱ्या पिढीतील पोलीस कर्मचारी होते. त्यांचे वडीलही पोलीस दलात कार्यरत होते. मनोज जोंधळे यांनी आपल्या सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणे उत्कृष्ट सेवा बजावली. विशेष म्हणजे, त्यांच्या सेवानिवृत्तीस अवघे दोन महिने शिल्लक असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. वास्तव न्यूज लाईव्ह परिवाराकडून मनोज जोंधळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच जोंधळे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. Kanthak Suryatal Post Views: 1,332 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पेटले युद्ध ….. ही अमेरिकेची जुनीच रणनीती;सणांच्या दरम्यान हल्ले करणे सर्वोच्च न्यायालयाने एसआयआर प्रक्रियेला कायदेशीर संरक्षण दिले