नांदेड (प्रतिनिधी)- सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी नांदेड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाधीश नरेंद्र ब्रम्हे यांनी पती आणि दीराला दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्षांची सक्तमजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील फिर्यादी मोहम्मद निशाद अली मोहम्मद नेमत अली यांची बहिण रेश्मा वसीम हिचा विवाह 2018 मध्ये 14 पूर्वी सरफराज अहमद मोहम्मद हुसेन याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही वर्षांपासून रेश्मा हिला सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दाम्पत्याला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. सततच्या छळाला कंटाळून रेश्मा हिने 24 डिसेंबर 2018 रोजी राहत्या घरी पंख्याच्या लोखंडी कडीला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी तिला खाली उतरवून तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 306, 498-अ, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा क्रमांक 415/2018 दाखल केला. तपासादरम्यान पती सरफराज अहमद मोहम्मद हुसेन, त्याचा भाऊ नय्यर हुसेन मोहम्मद हुसेन तसेच कुटुंबातील इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या खटल्यात एकूण 13 साक्षीदारांची साक्ष व सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे यांनी पती सरफराज अहमद मोहम्मद हुसेन आणि त्याचा भाऊ नय्यर हुसेन मोहम्मद हुसेन यांना दोषी ठरविले. न्यायालयाने दोघांनाही भारतीय दंड संहिता कलम 498-अ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच पतीस 10 हजार रुपये व दीरास 5 हजार रुपये असा एकूण 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या दंडाच्या रकमेतून 10 हजार रुपये फिर्यादी मोहमद निषाद अली यास नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. रणजीत देशमुख यांनी कामकाज पाहिले, तर शिक्षेच्या सुनावणीवेळी अॅड. एम. ए. बत्तुल्ला (डांगे) यांनी अत्यंत महत्वपूर्ण बाजू मांडली. पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बी. एस. कोळनुरे यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पूर्ण केले. Kanthak Suryatal Post Views: 1,077 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्वारातीम विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या जाहीर महाराष्ट्रात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम ; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा