सुरक्षा गस्त व ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफ नांदेडची यशस्वी कारवाई

नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) दोन स्वतंत्र कारवायांमध्ये सतर्कता दाखवत रेल्वे परिसरातील सुरक्षा मजबूत ठेवत प्रवाशांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात यश मिळवले आहे.

रेल्वे मार्गाजवळ संशयित व्यक्ती ताब्यात

रात्र गस्त व पिकेटिंग दरम्यान पूर्णा (PAU) पोस्ट, परभणी (PBN) येथील आरपीएफ कर्मचारी तसेच जीआरपी कर्मचारी पोखरणी नरसिंहा (PKNS) रेल्वे स्थानकाच्या गंगाखेड (GNH) बाजूकडील होम सिग्नलजवळ, एलसी गेट क्र. ०६ परिसरात गस्त घालत होते.

दरम्यान सुमारे ००:३० वाजता दोन व्यक्ती संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आले. आरपीएफ पथकाने तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:
1. राजू, रा. परभणी
2. छगन, रा. परभणी

त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना जीआरपी, परळी यांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत जीआरपी परळी येथे गुन्हा क्र. 0034/2026, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 122 (C) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

ऑपरेशन अमानत अंतर्गत प्रवाशांचे ₹४.६० लाखांचे सामान परत

दुसऱ्या घटनेत ऑपरेशन अमानत अंतर्गत दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी डीएससीआर/नांदेड कंट्रोल कडून संदेश प्राप्त झाला की गाडी क्रमांक 12716 सचखंड एक्सप्रेस च्या A-2 डब्याच्या दरवाजाजवळ तीन बॅगा बेवारस अवस्थेत आढळून आल्या आहेत.संदेश मिळताच IPF/पूर्णा @ परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली SIPF सेलू श्री. आर. के. मीना तसेच कर्तव्यावर असलेले कर्मचारी हेड कॉन्स्टेबल जगदे प्रसाद यांनी सेलू रेल्वे स्थानकावर गाडी येताच त्या बॅगा सुरक्षितपणे खाली उतरवून ताब्यात घेतल्या.

यानंतर बॅगांच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. संबंधित प्रवाशाने आपले नाव कदम अश्रू किसन (वय ३२ वर्षे), रा. जोतिबाचीवाडी, उस्मानाबाद असे सांगितले. त्यांनी सांगितले की ते आपल्या कुटुंबासह गाडी क्रमांक 12715 सचखंड एक्सप्रेसने जालना ते अमृतसर प्रवास करत होते. प्रवासादरम्यान B-4 डबा (बर्थ क्रमांक 47 व 55, RAC) मध्ये त्यांचा प्रवास होता. चुकून त्यांनी आपले सामान 12716 सचखंड एक्सप्रेस मध्ये ठेवले होते.

संबंधित प्रवाशाचा जबाब नोंदवून पडताळणी केल्यानंतर त्यांना त्यांचे सामान सुरक्षित अवस्थेत पावती घेऊन सुपूर्द करण्यात आले.

सदर बॅगांमध्ये खालील साहित्य आढळले:
• ३० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ₹४.५ लाख)
• कपडे
• चार्जर
• पर्स
• खाद्यपदार्थ

एकूण किंमत: ₹४,६०,०००

या दोन्ही यशस्वी कारवायांमुळे आरपीएफ नांदेड विभागाची सतर्कता, कर्तव्यदक्षता व प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!