क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी 

नांदेड:-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आज ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांच्या वतीने स्व. वसंतराव नाईक चौक ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

या प्रभात फेरीत शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच महाविद्यालयीन सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून तसेच शैक्षणिक संदेशपर कविता सादर करून सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला.

यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रमुख उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना द्विशताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच समग्र वाङ्मय ग्रंथ भेट म्हणून प्रदान केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्ह्याचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!