नांदेड (प्रतिनिधी)-गोपाळचावडी परिसरात असलेल्या श्री गुरु दशमुखाश्रम, भीमाशंकर नगर येथे येत्या दि. 5 ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणार्या विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु केदार पीठाधीश्वर यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सवास आज दि.5 फेबु्रवारी रोजी या महोत्सवास शहरातील आनंदनगर भागात असणार्या केदारे सत्संग भवनापासून शोभा यात्रेने सुरूवात होणार असून या कार्यक्रमासाठी दररोज 50 हजार भाविकांसह समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती श्री.श्री.श्री.1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
या पत्रकार परिषदेला श्री.108 नलवडी शांतलिंग शिवाचार्य स्वामी दावनगिरी कर्नाटक, श्री.108 शिवलिंग शिवाचार्य स्वामी हेडगापूर कर्नाटक, केदार देवस्थान येथील पुजारी वागिसलिंग, शिवलिंग चपटा महाराज, आ.आनंदराव बोंढारकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ.ईश्र्वरराव भोसीकर, माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक किशोर स्वामी, जि.प.माजी सभापती संजय बेळगे, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, माजी सभापती बालाजी पांडागळे, एकनाथराव मामडे, बाबुराव देशमुख यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.
विश्र्वशांती महायज्ञ हे कोणत्याही धर्म, जात, पंतासाठी नसून सर्व मानव कल्याणासाठी हा विश्र्वशांती यज्ञ केला जात आहे. आज देशासह संपुर्ण जगात अशांतीचे वातावरण आहे. जेंव्हा जेंव्हा अशा प्रकारचे वातावरण निर्माण होते. तेंव्हा अशा महायज्ञाची आवश्यकता असते. आपण नेहमी पुजा करतो, प्रार्थना करतो पण यातून मानव कल्याणासाठी शांती मिळत नाही. याचबरोबर या कार्यक्रमात शिवमहापुराण कथेचेही आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत श्री.श्री.श्री.1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्र, तेलंगणा,आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड व दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री तसेच अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दररोज साधारणतः 50 ते 60 हजार भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. रविवारी झालेल्या बैठकीला 200 हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
भव्य शोभायात्रा, अन्नदान व दररोज धर्मसभा
5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता केदारेश्वर सत्संग मंडळ, आनंदनगर येथून नवा मोंढा – आयटीआय वजीराबाद – शिवाजी पुतळा – चिखलवाडी – गुरुद्वारा चौक – जुना मोंढा मार्गे भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेत अश्व, हत्ती, फटाके, कुंभ-कलश, आरती, लेझीम पथक, भजनी मंडळ यांचा समावेश असेल. जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
मानव कल्याणासाठी विश्र्वशांती महायज्ञ-केदार जगद्गुरु
