बारामती (प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवासात वापरल्या जाणाऱ्या विमानाला आज सकाळी बारामती विमानतळाजवळ उतरण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.त्यात उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर परिसरात तातडीने पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथके दाखल झाली असून मदत व बचावकार्य सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विमान उतरत असताना तांत्रिक बिघाड अथवा हवामानाशी संबंधित अडचण निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातातील जीवितहानीबाबत विविध दावे समोर येत असले तरी प्रशासनाकडून अद्याप अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमकी संख्या व तपशील स्पष्ट होणे बाकी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रवासात काही सहकारी व सुरक्षादलातील कर्मचारी विमानात असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचे नावही चर्चेत आहे; मात्र नावांची व तपशीलांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन उच्च पातळीवर सतर्क झाले असून नागरिक विमानन महासंचालनालय (DGCA) कडून तपास सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, अजित पवार यांची आज बारामती परिसरात नियोजित कार्यक्रमांची मालिका होती, अशी माहितीही सूत्रांकडून देण्यात येत आहे.
वास्तव न्यूज लाईव्ह परिवार पवार कुटुंबियांसह इतर पाच मरण पावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

महाराष्ट सरकारने आज राज्यात सार्वजिनक सुट्टी जाहीर केली आहे. आज पासून दिन दिवस दुखवटा घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंती एकनाथ शिंदे काही वेळातच बारामती कडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस-
दादा गेले!
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.
मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.

संबंधित व्हिडिओ ..
व्हिडिओ ..१
व्हिडिओ ..२
