जिल्हा कारागृहात बंद्यांना मानवी हक्काबाबत मार्गदर्शन

नांदेड – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त 10 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा कारागृहात मानवी हक्काबाबत बंद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर व्यंजने, विधी सेवा प्राधिकरणाचे ए.व्ही. सराफ, एच.व्ही.संतान, श्रीमती शितल गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संपत हामु आढे, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव प्रदीप कुमार डोंगे, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वाकरे, महाराष्ट्र राज्य पुणे चे विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधार सेवा योगेश देसाई यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!