नांदेड–दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00, दुपारी 03:00, सायंकाळी 05:00 व रात्री 09:00 वाजता नायगाव तालुक्यातील टाकळी (बु) या गावात भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली . त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या आवाजाची/ धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आढळून आले. तरीही अजून सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना देखील माहिती घेण्यास सांगितले आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार नायगाव यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच कोणत्याही अफवांनावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.
More Related Articles
पंतप्रधानांऐवढेच विरोधी पक्षांनाही महत्व-खा.रविंद्र चव्हाण
नांदेड(प्रतिनिधी)-नुकतेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. पण या अधिवेशनात एपस्टीन फाईल्स प्रकरणावरुन गोंधळ माजला होता.…
संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या 25 वर्ष सेवेसाठी धन्यवाद(शुकराना) समारंभ
नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड श्री हजुर साहिब येथे मुख्य जत्थेदार पदावर काम करणारे संत बाबा कुलवंतसिंघजी यांना आपल्या…
मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड तयार करुन घ्या – जिल्हाधिकारी
*जिल्हाधिकाऱ्यांनी निर्माण केले 104 वर्षीय आजीबाईंचे आयुष्यमान कार्ड* नांदेड :- नांदेड जिल्ह्यात सध्या…
