विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग नोंदविण्याचे आवाहन नांदेड:-राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून 2025 रोजी सकाळी 8 वा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिनानिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या समता दिंडीमध्ये जिल्ह्यातील महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयामार्फत सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन समता दिंडीची सुरवात होईल. या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे दिंडीचा समारोप होईल. Kanthak Suryatal Post Views: 785 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना पोलीसाकडून पोलीस महासंचालकांच्या गृह कर्ज मंजुर करून देण्यासाठी 3 हजाराची लाच फोन पे वर स्विकारणाऱ्या लिपीकाला आणि त्याच्या भावजीला अटक