नांदेड:- जिल्हा रुग्णालय येथे “मासिक पाळी स्वच्छता दिवस” आज साजरा करण्यात आला. यावेळी मासिकपाळी संदर्भात समाजामध्ये असणारे गैरसमज याविषयी माहिती देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं) डॉ. आर.एस.बुट्टे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, श्रीमती डॉ.पुष्पा गायकवाड, तसेच बाह्यरुग्ण विभागाच्या मेट्रन सहाय्यक अधिसेविका श्रीमती सुनिता राठोड नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती सुनिता बोथिकार तसेच आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट चा उजास उपक्रमाचे जिल्हा समन्वयक स्वाती महानंदा सुरेश व संवादक सुकेशनी टालमाणी हे यावेळी उपस्थित होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साखरे, डॉ. पुष्पा गायकवाड व श्रीमती धनश्री अर्जुनराव गुंडाळे राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम समुपदेशक यांनी मासिकपाळी संदर्भात माहिती देऊन मासिक पाळी स्वच्छता दिवस का साजरा केला जातो, मासिक पाळी विषयी समाजात असलेले समज गैरसमज बद्दल मार्गदर्शन केले. मासिक पाळी म्हणजे काय ? व सॅनेटरीपॅडचा उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मासिक पाळी मध्ये काय काळजी घेतली पाहिजे, आहार कसा घ्यावा, योगा आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे याविषयी माहिती दिली, तसेच कवितेतुन व “का का कुमारी” ह्या नाटिकेच्या माध्यमातून मासिक पाळी विषयी समाजामध्ये असणारे गैरसमज याविषयी खूप छान प्रकारे संदेश दिला आहे. या विषयीवर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, रुग्ण, नातेवाईक यांना माहिती सांगितली. Kanthak Suryatal Post Views: 929 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लग्नासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू न्याय संस्थेचे सिंघम स्वरुप न्यायमुर्ती भूषण गवई यांनी दाखवले