नांदेड: नांदेड येथील तरुण आणि प्रसिद्ध पत्रकार आणि “मेरी आवाज न्यूज” या युट्यूब चॅनलचे संपादक मुबीन कामरानी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते बऱ्याच दिवसापासून कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराने ग्रस्त होते आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर नांदेड, हैदराबाद आणि मुंबई येथील विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु आजारात कोणतीही लक्षणीय सुधारणा झाली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथील शिवस श्वास रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर, सोमवार, ५ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, ६ मे रोजी ५ वाजता असरच्या नमाजानंतर गाडीपुरा येथील बडी दर्गा मशिदीत अदा करण्यात आली आणि त्याच्या शेजारील कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील शेकडो लोक उपस्थित होते. दिवंगत मुबीन कामरानी यांनी “मेरी आवाज न्यूज” या युट्यूब चॅनेलद्वारे अल्पावधीतच पत्रकारिता क्षेत्रात एक अनोखा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने नांदेडच्या पत्रकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, पत्नी, आई वडील, पाच भाऊ, दोन बहिणी इत्यादींचा समावेश आहे.
More Related Articles
मध्यवर्ती बसस्थानकाचे 12 एप्रिल पासून नवीन कौठा भागात स्थलांतर
नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या अनेक दिवसापासून मध्यवर्ती बसस्थानकाचे स्थलांतर होणार असल्याची चर्चा होती. यासाठी अनेक ठिकाणी पर्यायी जागेचा…
नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक;विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित
नांदेड – राज्य निवडणूक आयोगाकडून नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी…
दारु विक्रीचे पैसे बळजबरी चोरणाऱ्या चार जणांना अटक
नांदेड(प्रतिनिधी)-ऑक्टोबर 2024 मध्ये वाईन शॉपमध्ये दारु विक्रीतून जमा झालेले पैसे 2 लाख 75 हजार रुपये…
