नांदेड (प्रतिनिधी) – अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या पंधरवड्यात विविध अवैध व्यवसायांविरुद्ध ५९३ कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये ९०६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण ९ कोटी ८२ लाख ८१ हजार ३७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा विक्री, मटका-जुगार, अवैध दारू विक्री, शस्त्र अधिनियम तसेच इतर अवैध व्यवसायांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ नुसार गुटखा व्यावसायिकांविरुद्ध ४ कारवाया, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ७६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ४१२, शस्त्र अधिनियमान्वये १४, तर इतर अधिनियमांखाली ८७ कारवाया करण्यात आल्या. जिल्हानिहाय कारवाईचा विचार करता, नांदेड जिल्ह्यात गुटख्याचे १, मटका-जुगाराचे ३६, दारूबंदी कायद्याचे ९५, शस्त्र अधिनियमाचे ८ आणि इतर ३८ असे एकूण १७८ गुन्हे दाखल करण्यात आले. परभणी जिल्ह्यात गुटख्याचे १, मटका-जुगाराचे १३, दारूबंदी कायद्याचे ८०, शस्त्र अधिनियमाचे २ आणि इतर १४ असे एकूण ११० गुन्हे नोंदविण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात गुटख्याचा एकही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. मात्र, मटका-जुगाराचे ९, दारूबंदी कायद्याचे १४०, शस्त्र अधिनियमाचे २ आणि इतर १५ असे एकूण १६६ गुन्हे दाखल करण्यात आले. लातूर जिल्ह्यात गुटख्याचे २, मटका-जुगाराचे १८, दारूबंदी कायद्याचे ९७, शस्त्र अधिनियमाचे २ आणि इतर २० असे एकूण १३९ गुन्हे नोंदविण्यात आले. या मोहिमेत पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयातील विशेष पथकाने परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे वाळूविरोधात, तर लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंदन चोरीविरोधात केलेल्या कारवायांचाही समावेश आहे. खबर हेल्पलाइनवर अवैध व्यवसायांची माहिती द्या नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी या हेल्पलाइनवरून आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाला द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 307 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्ह्यातील १६ तालुके पाणीटंचाई क्षेत्र घोषित ; विहिरी व बोअरवेल खोदकामावर निर्बंध सीमेवर शहीदांचा शोक, परदेशात मारो ढोलनावर स्वागत! परदेश दौऱ्यांमागील राजकीय दुटप्पीपणाचे वास्तव काय?