विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार सन्मान – समाजभूषण, नारीरत्न, कृषिभूषणसह १५ मानाच्या पुरस्कारांची घोषणा जळगाव (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, कृषी, साहित्य, आरोग्य, पर्यावरण आणि उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. संस्थेच्या वतीने गुणवंत शिक्षक, समाजभूषण, नारीरत्न, कृषिभूषण, साहित्य भूषण, पर्यावरण मित्र, यशस्वी उद्योजक, आदर्श आरोग्य दूत, आदर्श अधिकारी, आदर्श सरपंच, पोलीस पाटील, सहकार मित्र आणि प्रेरणादायी दाम्पत्य अशा एकूण १५ विविध श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे. सामाजिक, राजकीय, ग्रामविकास क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पुरुषांसाठी समाजभूषण, महिलांसाठी नारीरत्न तर शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी कृषिभूषण व कृषिमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. असा पाठवा प्रस्ताव इच्छुकांनी आपली माहिती PDF स्वरूपात न पाठवता व्यवस्थित टाईप करून आणि स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो व दोन हाफ साईज ठळक फोटोंसह 9022541218 या व्हाट्सअप क्रमांकावर लवकरात लवकर पाठवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रस्तावात खालील बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे : १) पूर्ण नाव, २) व्हाट्सअप संपर्क क्रमांक, ३) पूर्ण पत्ता, ४) पद, ५) नियुक्तीचे ठिकाण, ६) संस्था/संघटनेचे नाव, ७) अपेक्षित पुरस्काराचे नाव, ८) केलेले कार्य व उपक्रमांचा थोडक्यात तपशील. पुरस्कार निवड समिती प्राप्त प्रस्तावांची छाननी करून पात्र व्यक्तींशी थेट संपर्क साधेल व पुढील सूचना देईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. जळगावातील अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण सोहळा संपन्न होणार असून, खान्देशसह महाराष्ट्रातील कर्तृत्ववानांना आपले कार्य सादर करण्याची ही सुवर्णसंधी आहे. Kanthak Suryatal Post Views: 20 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुंबईत पळवाट, गोव्यात कणा! मतदार यादीच्या मुद्द्यावर हायकोर्टाच्या दोन खंडपीठांचे दोन परस्परविरोधी चेहरे!