नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील देगाव चाळ परिसरातील साईनाथ पांचाळ यांच्या हार्डवेअर दुकानासमोर गणेश मंडळातील जुन्या वादाच्या रागातून एका तरुणावर तलवार, खंजर आणि लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात चार नामजद आरोपींसह अन्य चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाहनाच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी तक्रारदार मनोज प्रभाकर माने हे आपल्या स्कुटीवरून वजीराबाद मार्केटच्या दिशेने जात असताना हार्डवेअर दुकानासमोर थांबले होते. काही दिवसांपूर्वी गणेश मंडळाच्या कार्यक्रमादरम्यान रस्त्यात वाहन उभे करण्यावरून वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी तेथे येत तक्रारदाराचे नातेवाईक शंकर माने यांना शिवीगाळ करत लक्ष्य केले. डोक्यात आणि छातीवर गंभीर वार; रुग्णालयात उपचार सुरू हल्लेखोरांनी शंकर माने यांच्यावर तलवार आणि खंजराने गंभीर वार केले. त्यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीवर व पाठीवर वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात शंकर माने गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वजीराबाद पोलिसांत एफआयआर दाखल तक्रारदार मनोज माने यांच्या फिर्यादीवरून रोहित उर्फ सोनू रमेश गोडबोले, आदित्य हटकर, रोहन नवघडे आणि अजय थोरात यांच्यासह अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वजीराबाद पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १:४१ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमे तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ४, २५ आणि २७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. हल्ल्यात वापरलेली शस्त्रे जप्त करणे आणि आरोपींचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम वजीराबाद पोलिसांकडून सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 94 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिवरोडवर तिरट जुगार अड्ड्यावर भाग्यनगर पोलिसांचा छापा