ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या सुरक्षित ताब्यात :
03.09.2026 रोजी सायंकाळी सुमारे 19:30 वाजता जालना रेल्वे स्थानकाच्या फलाट फोर्म क्र. 02 वर गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक / परतूर तसेच RPF कर्मचाऱ्यांना एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद स्थितीत आढळली. चौकशी केल्यानंतर तिचे वय 14 वर्ष असून ती हैदराबाद येथील रहिवासी असल्याचे समोर आले. मुलगी आपल्या आईसोबत चिखली, जिल्हा बुलढाणा येथील सैलानी दर्गा येथे आली होती. कौटुंबिक कारणामुळे ती आईला न सांगता तेथून निघून गेली होती. RPF कर्मचाऱ्यांनी तिच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी मुलीला Child Helpline, जालना च्या प्रतिनिधींच्या सुरक्षित ताब्यात देण्यात आले.
ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत अल्पवयीन मुलगा बाल सुधार गृहात सुरक्षित सुपूर्द :
03.09.2026 रोजी गाडी क्र. 11001 नंदीग्राम एक्स्प्रेस मध्ये रोटेगाव – लासूर दरम्यान तिकीट तपासणी करत असताना तिकीट तपासनीस श्री मनमोहन हिमराज मीना यांना कोच क्र. S-3, बर्थ क्र. 16 येथे एक अल्पवयीन मुलगा आढळला. मुलगा बोलू अथवा ऐकू शकत नसल्याने त्याला स्वतःचे नाव, पत्ता किंवा पालकांची माहिती सांगता येत नव्हती. त्याला RPF कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आणि Child Helpline 1098 ला माहिती देण्यात आली. मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याची ओळख पटविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील इंदिरा रेसिडेन्शियल स्कूल फॉर मेंटली चॅलेंज्ड चिल्ड्रन येथे नेऊन शिक्षकांच्या मदतीने सांकेतिक भाषा द्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याची ओळख किंवा पालकांबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
मुलाने परिधान केलेल्या टी-शर्ट वरील Bajaj Finserv या चिन्हाच्या आधारे संबंधित कामगार पुरवठादारांशी संपर्क साधण्यात आला. त्याचबरोबर मुलाचा फोटो WhatsApp द्वारे पाठवून त्याची ओळख पटल्यास RPF ला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व प्रयत्नांनंतरही मुलाची ओळख पटू न शकल्याने, संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्याला योगेश्वरी बालसुधारगृह, छत्रपती संभाजीनगर येथे सुरक्षित स्थितीत सुपूर्द करण्यात आले. मुलाच्या सुरक्षितता, काळजी आणि पुढील आवश्यक कार्यवाहीची जबाबदारी संबंधित संस्थेकडे देण्यात आली.
ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत संशयित खिशेकापू पकडला :
03.09.2026 रोजी क्राइम इंटेलिजेंस ब्रांच /नांदेड , विशेष CPDS टीम/नांदेड यांनी वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त व सहायक सुरक्षा आयुक्त यांच्या देखरेखीखाली प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्यावर पाळत ठेवली.
या दरम्यान गाडी क्र. 17663 (नगरसूल-काचीगुडा ) च्या संदर्भात फलाट फोर्म क्र. 1 वर प्रवाशांच्या खिशातील वस्तू चोरण्याच्या संशयावरून एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी लोहमार्ग पोलीस / परभणी कडे सुपूर्द करण्यात आले. लोहमार्ग पोलीस / परभणी यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा क्र. . 46/2026 अंतर्गत सेक्शन 128 of भारतीय न्याय संहिता (BNSS) नुसार गुन्हा नोंदविला.
ऑपरेशन अमानत अंतर्गत प्रवाशाचे हरवलेले सामान परत :
03.09.2026 रोजी रेल मदद द्वारे प्राप्त तक्रारीनुसार गाडी संख्या 17663, कोच S-2, बर्थ क्रमांक 24 येथे प्रवाशाची ट्रॉली बॅग राहून गेल्याची माहिती मिळाली. रेल्वे सुरक्षा बल / नांदेड चे हेड कॉन्स्टेबल श्री आर डी दबाडे यांनी तत्काळ संबंधित कोच मध्ये जाऊन ट्रॉली बॅग शोधून ती RPF पोस्ट , नांदेड येथे सुरक्षित ठेवली.
05.09.2026 रोजी संबंधित प्रवासी RPF पोस्ट , नांदेड येथे आला. चौकशीनंतर सदर ट्रॉली बॅग त्याचीच असल्याची खात्री करण्यात आली. सुमारे Rs. 10,000 किमतीचे कपडे असलेली ट्रॉली बॅग योग्य पावती व पोच पावती घेऊन प्रवाशाला सुरक्षितपणे परत करण्यात आली. प्रवाशाने रेल्वे सुरक्षा बल, नांदेड च्या तत्पर कार्यवाहीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आणखी एका संशयितास पकडले:
06.09.2026 रोजी सुमारे 00:10 वाजता गाडी संख्या. 17205 (श्री साईनगर शिर्डी – काकिनाडा एक्स्प्रेस) च्या परभणी रेल्वे स्थानक येथील थांब्यादरम्यान फलाट क्रमांक 02 वर Crime Intelligence Branch (क्राइम इंटेलिजेंस ब्रांच) / नांदेड आणि लोहमार्ग पोलीस, परभणी यांच्या संयुक्त पथकाने प्रवाशांच्या सामानाची चोरी करणारे गुन्हेगारांवर पाळत ठेवून निगराणी केली
या वेळी प्रवाशांच्या सामानाची चोरी करण्याच्या संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून त्याच्या उपस्थितीबाबत समाधानकारक कारण किंवा विश्वसनीय स्पष्टीकरण मिळाले नाही.
सदर व्यक्तीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी लोहमार्ग पोलीस परभणी कडे सुपूर्द करण्यात आले. लोहमार्ग पोलीस परभणी यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक. 89/2026, U/s 122(c) of the Maharashtra Police Act, dated 06.09.2026 नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
प्रवासी सुरक्षेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न :
या सर्व घटनांमध्ये रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, बाल मदतनीस क्रमांक (क्राइम इंटेलिजेंस ब्रांच) तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी दाखविलेली सतर्कता, तत्परता आणि समन्वय उल्लेखनीय आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेपासून प्रवाशांच्या सामानाचे संरक्षण आणि संशयित गुन्हेगारांविरुद्ध तातडीची कार्यवाही यामुळे नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षा आणि सेवा-केंद्रित कार्यपद्धती अधोरेखित झाली आहे
