जागतिक कर्तृत्वाचा गौरव, निसर्गप्रेमाचा सन्मान नांदेड (प्रतिनिधी)-नांदेडचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुण मान्नीकर यांना हैदराबाद येथे आयोजित ग्लोबल समिट ऑन हायपरटेन्शन अँड कार्डिओमेटाबॉलिक डिसऑर्डर्स-२०२६ या आंतरराष्ट्रीय परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील चार दशकांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जागतिक स्तरावर गौरविण्यात आल्यानंतर, त्यांच्या सन्मानार्थ सुहृद व निसर्गप्रेमी मित्रमंडळातर्फे आत्मीयतेने कौटुंबिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याच वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. माधुरी मान्नीकर यांनी स्वतःच्या गच्चीवर सेंद्रिय पद्धतीने विकसित केलेल्या टेरेस गार्डनची विशेष दखल घेत त्यांचाही सन्मान करण्यात आला. डॉ. माधुरी मान्नीकर यांनी साकारलेल्या हिरव्यागार टेरेस गार्डनमध्ये विविध प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला, औषधी वनस्पती आणि फुलझाडे जोपासण्यात आली आहेत. मर्यादित जागेत सेंद्रिय शेतीचा आदर्श निर्माण करणार्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. डॉ. अपूर्वा व डॉ. विक्रांत मान्नीकर यांनी सर्वांचे स्वागत भेटवस्तू देऊन केले. या कार्यक्रमात जयंत वाकोडकर, सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ. दीपक कासराळीकर, ज्येष्ठ पत्रकार प्रा.सु. मा. कुलकर्णी तसेच मानसी महिला पुरवणीच्या संपादक अनुजा शंतनू डोईफोडे यांनी डॉ. मान्नीकर कुटुंबीयांच्या वैद्यकीय, सामाजिक आणि मानवी मूल्यांनी समृद्ध अशा कार्याचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाशी जपलेले नाते या त्रिसूत्रीमुळे मान्नीकर कुटुंब समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याचे वत्तäयांनी नमूद केले. कार्यक्रमाचा प्रारंभ पं. संजय जोशी यांच्या सुश्राव्य गुरुवंदनेने करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा.सु. मा. कुलकर्णी, डॉ.दीपक कासराळीकर, पं. संजय जोशी व सौ.जोशी, संतोष कुलकर्णी व डॉ. भाग्यश्री कुलकर्णी, अनुजा शंतनू डोईफोडे, भगवानराव व सौ. शामाताई देशमुख, मुकुंद व सौ. मोरोगीरी, चैतन्य व सौ. प्राजक्ता वाकोडकर, सौ. रजनी वाकोडकर, प्रकाश पत्तेवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जयंत वाकोडकर व सौ. रजनी वाकोडकर यांचाही डॉ. मान्नीकर कुटुंबीयांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आपुलकी, स्नेह, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणारा हा कौटुंबिक स्नेहसोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी व्यक्त केली Kanthak Suryatal Post Views: 634 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोन दिवसांच्या संततधार पावसाने सहस्रकुंड धबधबा प्रवाहित; पर्यटकांची गर्दी वाढली पोर्टलवरील कर्जमाफीची रक्कमच अंतिम; शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले