नांदेड (प्रतिनिधी)– शहरात हिसकावून चोरी आणि घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांत अज्ञात चोरट्यांनी मिळून सुमारे १ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला असून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. २२ जून २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अंबिकानगर येथील आशिर्वाद गार्डनसमोर मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सांगिता संजयकुमार सेठिया (वय ५५, रा. कावरा नगर, नांदेड) यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनिरीक्षक देशमुख करीत आहेत. दरम्यान, दुसरी घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हडको परिसरात घडली. १९ जुलै रात्री ते २० जुलै सकाळी या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी श्री राजराजेश्वर किराणा जनरल स्टोअर्स या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. दुकानातील नगदी रक्कम, बिस्किटे, सिगारेट व एक मोबाईल फोन असा ६,६०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी पांडुरंग गोविंदराव मुटोपवाड (वय ५५, रा. बालाजी नगर, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोउपनिरीक्षक आकाडे करीत आहेत. शहरात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक प्रभावी करण्याची तसेच नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 765 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आमच्या पैशावर जगता, आम्हालाच मारताय? दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर आंदोलक संतापले! मोदींच्या घराबाहेर भयंकर राडा! राहुल गांधी आणि खासदारांशी पोलिसांची धक्काबुक्की; विना वर्दीतले ते गुंड कोण?