नांदेड – पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि.5 जून 2026 रोजी नांदेड शहरातील माता गुजरीजी उद्यान नांदेड येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपन करून वृक्षाचे महत्व या विषयावर संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमास नांदेड वाघाळा शहर महानगरपालीकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, जिल्हा युवा अधिकारी आशनी कानकटे, भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.मोहन चव्हाण, विजय पवार, कार्यक्रमाचे संयोजक लवकुश जाधव, प्रकाश झडते, अंकुश जाधव, संभाजी सावते, प्रकाश सोनकांबळे, शैलेश गजभारे, शंकर आंदूरे, मनोहर राठोड यांच्यासह अनेक सेवाभावी संस्था, युवा मंडळ, पर्यावरण प्रेमी यांची उपस्थिती होती. यावेळी उद्यान परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती वृक्षांचे रोपटे लावून पहाटे मॉर्निंग वॉकसाठी व सायंकाळी उद्यानात येणाऱ्या लहान बालक, वृक्ष नागरिकांनाही शुद्ध ऑक्सीजन मिळावे या उदात्त हेतुने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या हस्ते वृक्षारोपन करून पर्यावरणाचे महत्व पटवून सांगितले. शेवटी लवकुश जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. Kanthak Suryatal Post Views: 664 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विधान परिषदेसाठी 99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान शहाजी उमाप यांचा भ्रष्टाचारावर सर्जिकल स्ट्राईक: वर्दीला कलंक लावणाऱ्यांची आता खैर नाही!एलसीबी परभणीच्या पोलीस निरीक्षकांना नांदेड जिल्ह्याची जबाबदारी