लातूर -जिल्ह्यात काही ठिकाणी मटका – जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड येथून कारवाईसाठी पोलीस पथक पाठविले होते. सदर पथकाने, दिनांक 13/06/2026 रोजी, औसा शहरातील कालन गल्लीतील अबुझर शेख याचे दुकानामध्ये चालू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत 43,160/- रुपयांची रोकड, 49 हजार रुपयांचे (05) मोबाईल व 70,800/- रुपयांचे संगणक साहित्य, असा एकूण 1,62,960/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण (9) आरोपीतांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द औसा पोलीस ठाणे येथे गुरनं 325/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तद्नंतर, मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, कासार शिरशी येथे सचिन बार च्या बाजूला प्रभाकर माने यांच्या दुकानात छापा टाकला असता, सदर ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार खेळताना (9) इसम मिळून आले. सदर इसमांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून 32,910/- रुपयांची रोकड, 65,800/- रुपयांचे (9) मोबाईल, व 1,45,000/- रुपयांच्या (4) मोटारसायकली, असा एकूण 2,43,710/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांचेविरुध्द कासार शिरशी पोलीस ठाणे येथे गुरनं 137/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपरोक्त दोन्हीही कारवायांत, पोलीस पथकाने एकूण 4,06,670/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, (18) आरोपीतांविरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हे नोंद केले आहेत. सदर कारवाईत, पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकॉ/ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘ खबर ‘ हेल्पलाइन वरून माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,092 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation फोन पे द्वारे लाच स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यास अटक ,५० हजारांची लाच मागणाऱ्या ; १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा गजबजणार ; ४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचे पुन्हा शाळेत आगमन