मुखेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील जांब बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २.२० वाजताच्या सुमारास फिर्यादी सरोजा गोरखनाथ शृंगारे (वय ४३, रा. जांब बुद्रुक, ता. मुखेड) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील १ लाख रुपये रोख रक्कम तसेच सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी घरांची सुरक्षा वाढविण्याची गरज व्यक्त केली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 855 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा दगडाने ठेचून खून; तिघांना अटक नेहरूंच्या संसदीय प्रणालीला मागे टाकून एक मोदी युग निर्माण करायचे खलबत