नांदेड : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणासह इतरांची तब्बल 34 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोबर 2023 रोजी कोठारी कॉम्प्लेक्स येथील प्रीमियम फिटनेस परिसरात आरोपी संतोषसिंह देविसिंह चंदेल (रा. गोविंदनगर, नांदेड) याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी मीरा नंदकुमार धुळगंडे (वय 27, रा. दिपनगर, नांदेड) यांनी 27 लाख 36 हजार रुपये गुंतविले. याशिवाय इतर साक्षीदारांकडूनही पैसे घेण्यात आले. मात्र, गुंतवणुकीवरील परतावा न देता आरोपीने फिर्यादी व इतरांची एकूण 34 लाख 56 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 254/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 318(4) व 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत असून, आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना संबंधित व्यक्तीची विश्वासार्हता व अधिकृतता तपासूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,306 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कार्यकारी अभियंता कार्यालय विष्णुपुरी पंप गृह विभागात आवक-जावक प्रणालीतून अवैद्य कारभार नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 8 मतदान केंद्रे निश्चित; 452 मतदार बजावणार मतदानाचा हक्क