पी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य नांदेड – जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी २० जून २०२६ पर्यंत आपली Farmer ID (फार्मर आयडी) नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासनाच्या २०२५ मधील निर्णयानुसार १५ एप्रिल २०२५ पासून पी.एम. किसानसह इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांची Farmer ID निर्मिती व अद्ययावतीकरणाचे काम प्राधान्याने सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण ७ लाख ५४ हजार ५१८ भूधारकांपैकी १ लाख ५१ हजार ३८ भूधारकांनी अद्याप AgriStack मध्ये नोंदणी केलेली नाही. तसेच ३ लाख ६९ हजार ३८४ पी.एम. किसान लाभार्थ्यांपैकी ३२ हजार ५०४ लाभार्थ्यांनीही AgriStack मध्ये नोंदणी केलेली नसल्याचे समोर आले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उर्वरित सर्व शेतकऱ्यांची Farmer ID नोंदणी २० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, Farmer ID नोंदणीबाबत जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर व्यापक प्रचार व प्रसिद्धी मोहीम राबविण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देऊन वेळेत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 760 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मराठा समाजासाठी मोठी आनंदाची बातमी: आता मिळणार ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती; काय करणार हे झुरळ उद्या जंतर मंतर वर