नांदेड- तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला आणि महापरिनिर्वाणही वैशाखी पौर्णिमेलाच झाले होते. या निमित्ताने तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ मे रोजी गगन मलिक फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा सिनेअभिनेते डॉ. गगन मलिक यांचे व्याख्यान आणि २१ मे रोजी महान त्यागी पुज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांचे प्रवचन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली. विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात १९ मे व २१ मे रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला स. ९ वा सुरुवात होणार असून १९ मे रोजी डॉ. गगन मलिक यांचे भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीने विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तर २१ मे रोजी भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांचे प्रवचन होणार आहे. तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार राहुलदादा आन्विकर यांचा बुद्ध भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला भिख्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी जिल्हा व परिसरातील बौद्ध उपासक उपासकांनी शुभ्र वस्त्रे परिधान करून दोन्ही दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 800 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड बार असोसिएशन निवडणुकीत यदुपत अर्धापूरकर यांची अध्यक्षपदी बाजी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली 7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड