तब्बल १२ गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत प्रस्ताव; शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा मोठा प्रहार

ऑपरेशन क्रॅकडाऊन : भाग्यनगर पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई

नांदेड : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी “ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत मोठी मोहीम हाती घेतली असून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत १२ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले,पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भाग्यनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींविरुद्ध मारामारी, दरोडा, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, धमकी देणे, खंडणी व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींच्या टोळ्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मोक्का प्रस्तावासाठी समाविष्ट करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –

1. साईसिंग ऊर्फ साईलाला दिपकसिंग गहरवार, वय 26 वर्ष, रा.बालाजी मंदीर कमान जवळ, सिडको, नांदेड

2. जयकुमार ऊर्फ सोनु कैलास राऊत, वय 23 वर्ष, मजुरी रा. सुमेध नगर, नांदेड

3. शाकेर खान रशीद खान, वय 30 वर्ष, व्यापार रा. मिल्लतनगर, नांदेड

4. शेख शाहरुख ऊर्फ कबुतर शेख अजगर, वय 29 वर्ष, बेकार रा. खुदबेनगर चौरस्ता, महेबुबीश कॉलनी, नांदेड

5. शेख उबेद शेख अजगर, वय 23 वर्ष, बेकार रा. फेमस फंक्शन हॉल जवळ मिल्लत नगर, नांदेड

6. दिग्वीजय गणेशराव नारागुडे, वय 22 वर्ष, खाजगी काम रा. सावीत्रीबाई फुले शाळेजवळ, शामनगर, नांदेड

7. मन्मत वसंतराव मंगरुळे, वय 25 वर्ष, पानशॉप रा. ग्री कॉलेजजवळ, लालवंडी रोड, ता. नायगाव, जि. नांदेड

8. नितेश परमेश्वर इंगळे, वय 22 वर्ष, शिवनगर, हनुमान मंदीरजवळ, नांदेड.

9. गौरव दिपकसिंग गहरवार, वय 30 वर्ष, व्यापार रा. शक्तीनगर, नांदेड.

10. सय्यद आवेज सय्यद खलील, वय 27 वर्ष, रा. खुदबेनगर चौरस्ता, नांदेड (मयत)

11. महंमद अरबाज महंमद फारुख, वय 23 वर्ष रा. इदगाह मैदान, इतवारा, नांदेड (मयत)

12. इलियास ऊर्फ काला इल्तुखान ईस्माइलखान, रा. खुदबेनगर चौरस्ता, नांदेड.

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळ्यांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद असून, त्यांच्या हालचालींवर विशेष पाळत ठेवण्यात येत होती. सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

“ऑपरेशन क्रॅकडाऊन” अंतर्गत भविष्यातही अवैध धंदे, सराईत गुन्हेगार व संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही नांदेड पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!