नांदेड (प्रतिनिधी) – डॉ. आंबेडकर नगर, नांदेड येथील ज्येष्ठ उपासिका रुखमिनबाई शिवराम वाघमारे यांचे आज, दि. 25 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या, रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता त्यांच्या डॉ. आंबेडकर नगर येथील निवासस्थानातून निघणार असून शांतीधाम, गोवर्धनघाट, नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या डॉ. शंकररावजी चव्हाण शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथील सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर वाघमारे यांच्या मातोश्री होत. रुखमिनबाई वाघमारे यांच्या निधनाने समाजातील एक ज्येष्ठ, श्रद्धावान व मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 540 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जागरूक व्हा नागरिकांनो भारतीयांचे बँक खाते रिकामे करू शकतो ‘मिथोस’ खत टंचाई, लिकींग व काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधीकाऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर धडक तपासणी