नांदेड (प्रतिनिधी)- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत आरपीएफ नांदेड व लोहमार्ग पोलीस / नांदेड यांच्या संयुक्त पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई करत उच्च मूल्याच्या चेन स्नॅचिंगसह चार प्रकरणांतील चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी संयुक्त पथकाने प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी (ToPB) करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक केली. तपासादरम्यान त्यांचा संबंध लोहमार्ग पोलीस नांदेड येथे नोंद असलेल्या गुन्हा, दिनांक 26.02.2026 या उच्च मूल्याच्या चेन स्नॅचिंग प्रकरणाशी असल्याचे उघड झाले. यानंतर 05 एप्रिल 2026 रोजी पोलीस कोठडी (PCR) दरम्यान मुख्य आरोपी श्रीकांत, नांदेड याच्याकडून ₹4,83,000 किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान आरोपीने आणखी तीन चोरी व चेन स्नॅचिंग प्रकरणांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानुसार खालील गुन्ह्यांमध्ये चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. * गुन्हा क्र. 425 (दिनांक 07.08.2025) – 20 ग्रॅम चांदीचे दागिने (अंदाजे किंमत ₹10,000) * गुन्हा क्र. 276 (दिनांक 21.05.2025) – 26.5 ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ₹1,40,000) * गुन्हा क्र. 27 (दिनांक 28.01.2026) – 10 ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत ₹20,000) अशा प्रकारे आरपीएफ नांदेड व लोहमार्ग पोलीस / नांदेड च्या संयुक्त कारवाईतून विविध प्रकरणांतील लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे. दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी आरोपीस पोलीस कोठडीनंतर माननीय जेएमएफसी न्यायालय, नांदेड येथे हजर करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असे सांगितले आहे. Kanthak Suryatal Post Views: 675 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्या -बंटी लांडगे अंधाराशी रोजची झुंज ..