बिलोली (प्रतिनिधी)– दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायं. 3.30 ते रात्री 9.29 वाजेच्या दरम्यान बिलोली पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक शिवराज लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, आरोपी शंकर शिवराम मैलारे (वय 35), नबाजी बाबा वाघेकर (वय 34, दोघेही रा. गांधी चौक बिलोली) आणि ज्ञानेश्वर नागोराव करडे (वय 35, रा. बडूर ता. बिलोली) यांनी संगनमत करून शासकीय कामात विघ्न निर्माण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोस्टे बिलोली येथे तिघांवर गुन्हा रजि. क्रमांक 63/2026 भादंवि कलम 132, 221, 121(1), 149, 353(5) बीएनएस–2023 अन्वये दाखल करून तपास सुरू केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पंतोजी यांच्या मार्फत सुरु आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,047 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धर्माबाद मध्ये ग्रामसेवक पदाच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल शेख याहिया पत्रकारितेची बेअब्रू करीत आहे – नगरसेवक सय्यद फसियोद्दीन